शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

हातावर पोट असलेल्या श्रमिकांचे हाल

By admin | Published: November 17, 2016 3:39 AM

रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांना जगण्यासाठी रोजचे रोज दैनंदिन वस्तू खेरदी कराव्या लागतात.

पिंपरी : रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांना जगण्यासाठी रोजचे रोज दैनंदिन वस्तू खेरदी कराव्या लागतात. त्यांना ठेकेदारामार्फत आठवड्याला पगार दिला जातो. ही पगाराची रक्कम ठेकेदार जुन्याच नोटांच्या स्वरूपात देत आहेत. दैनंदिन व्यवहार करताना, त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या श्रमिकांचे हाल होत आहेत.केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच्या ठिकाणी नोटा वापरण्याची सुविधा आहे. मात्र, शहरातील विविध भागातील बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. दुष्काळा भागासह परराज्यातील मजूर याठिकाणी रोजंदारीची कामे करीत आहेत. हातावरचे पोट असल्याने रोजच्या रोज त्यांना भाजीपाला, अन्य जीवनाश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. परंतु त्याला प्रत्येक वेळी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. जुन्या नोटा स्वीकारण्याशिवाय मंजुरांपुढे दुसरा पर्याय नाही. पाचशेच्या नोटा घेणार असाल, तरच काम देऊ, असे ठेकेदार सांगतात. त्यामुळे रोजंदारीवरील मजुरांना या नोटा स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही. पैसे असूनही त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.(प्रतिनिधी)

रोख वेतनाने अडचणी...बहुतांश मजुरांचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खातेही उघडलेले नाही. ठेकेदार त्यांना चलनातून रद्द झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा देत आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांना बँक खाते उघडण्यापासूनची धावपळ करावी लागते आहे. अशीच परिस्थिती हॉटेल, गॅरेज आणि ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांची झाली आहे. काही हॉटेल व्यावसायिक, ट्रान्सपोर्टवाल्यांनी काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी मजुरांच्या हातावर हजार, पाचशेच्या नोटा ठेवल्या आहेत. आतापर्यंत नेहमी बँकेत पगार जमा करणाऱ्यांनी या वेळी रोख स्वरूपात मागील महिन्याचे वेतन दिले आहे.