विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नेहमीच आक्रमक राहिली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून, त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत जाणवत आहे.
मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा, मोदीजी भाषणांचे वशीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा, मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा, अशा विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्द्यांकडे वेधले जाणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार, लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
210921\img-20210921-wa0021__01.jpg
सोबत फोटो : अॅड.गणेश शंकरराव डिंबळे