शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

रद्द झालेल्या गाड्यांचे तिकीट कन्फर्म ; रेल्वे आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 9:16 PM

रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत.

पुणे : रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी गाड्यांचे आरक्षण निश्चित होत असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. त्याचप्रमाणे रद्द केलेल्या काही गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वेची यंत्रणा अद्ययावत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस दि. १६  ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांबपल्याच्या गाड्याही रद्द झाल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. या गाड्यांसाठी प्रवाशांनी काही दिवस आधीपासून आरक्षण केले आहे. अनेक प्रवाशांचे तिकीट निश्चित झालेले नाही. गाडी सुटण्याच्या वेळेच्या चार तास आधीपर्यंत हे तिकीट निश्चित होते. पण प्रतिक्षायादी प्रवाशांची संख्या जास्त असल्यास तिकीट निश्चित होत नाही. तर गाडी रद्द केल्यानंतर आरक्षण झालेले व प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांची तिकीटे आपोआप रद्द होतात. पण मागील काही दिवसांत रद्द झालेल्या गाड्यांचे आरक्षण निश्चित झाले असल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. 

पुण्यातील अ‍ॅड. आशुतोष रानडे यांनी दि. ५  ऑगस्ट  रोजी पुण्यातून सुटणाऱ्या  दि. १५  ऑगस्ट रोजीच्या इंटरसिटी एक्सप्रेसची तीन तिकीटे काढली होती. त्यावेळी प्रतिक्षायादी ३ ते ५ या क्रमांकावर तिकीटे होती. या कालावधीत रेल्वेकडून केवळ एक-एक दिवसासाठी गाडी रद्द केली जात होती. दि. ८   ऑगस्टला ही गाडी ११ तारखेपर्यंत रद्द करण्यात आली. त्यामुळे तिकीट निश्चित होतील, अशी अपेक्षा होती. पण रेल्वेने दि. ९  ऑगस्ट  रोजी ही गाडी दि. १६  ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे तिकीटे आपोआप रद्द झाली असतील, अशी अपेक्षा रानडे यांना होती. पण प्रत्यक्षात शनिवारी सकाळी तिनही तिकीटे निश्चित झाल्याचा संदेश त्यांना आला. ‘रद्द झालेल्या गाडीचे आरक्षण झाल्याने आयआरसीटीसीच्या ढिसाळ कामाचा अनुभव आला. इतर प्रवाशांनाही असे संदेश आले असतील. त्यातील काही प्रवासी त्यादिवशी येऊ शकतात. त्यामुळे यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत असावी,’ अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.गाडी रद्द झाल्यानंतर प्रवाशांना तसे संदेश जातात. तसेच संकेतस्थळावरही तातडीने गाडी रद्दबाबत माहिती अद्ययावत होते. काही तांत्रिक कारणांमुळे या बाबी अद्ययावत झाल्या नसाव्यात. आरक्षण निश्चित झाले असले तरी संबंधित प्रवाशांना रद्दचे संदेश जातील. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभागसंकेतस्थळ नाही अद्ययावतइंटरसिटी एक्सप्रेस (१२१२७) दि. १६ ऑगस्टपर्यंत रद्द असली तरी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ही गाडी दि. १४   ऑगस्टपर्यंतच रद्द असल्याचे दाखविण्यात आले आहे. दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी या गाडीच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पुणे ते मुंबईदरम्यानच्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. पण अद्याप प्रगती व डेक्कन एक्सप्रेस अधिकृतपणे रद्द केली नसल्याचे रेल्वेच्या संकेतस्थळावर दिसत आहे. या दोन्ही गाड्या आरक्षणासाठी दि. १६ तारखेपर्यंत उपलब्ध असल्याचे दिसत होते. त्यामुळे प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करू शकतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी