शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भोर पालिकेची स्थावर मालमत्ता जप्त करा

By admin | Published: March 26, 2016 2:59 AM

पंतसचिवांच्या खासगी विहिरीचे पाणी बेकायदा वापरून या पाण्याचे सुमारे १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे भोर नगरपलिकेच्या

भोर : पंतसचिवांच्या खासगी विहिरीचे पाणी बेकायदा वापरून या पाण्याचे सुमारे १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे भोर नगरपलिकेच्या स्थावर मालमत्तेची जप्ती करून, तिचा लिलाव करून, पैैसे वसूल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.भोरचे पंतसचिव सदाशिवराव यांच्या राजवाड्याच्या पाठीमागे असलेल्या खासगी मालकीच्या विहिरीचे पाणी सन १९७२ ते १९९३ या काळात विनापरवाना वापरले होते. मात्र, भोर नगरपालिकेने विजेचे बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन खंडित केले. या वीजबिलाची थकबाकी पंतसचिवांनी स्वत: भरून नगरपालिकेला पाणी वापरण्यास मनाई केली. यामुळे नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून विहिर अधिग्रहणाचे सहा महिन्यांचे आदेश प्राप्त केले होते. दरम्यान, नगरपालिकेने परवानगीशिवाय स्वत:च वीजजोड घेतले. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम दिली नाही. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे नगरपालिकेने २०/७/२००४ पर्यंत पाणी वापरले. याविरुद्ध विहिरीचे मालक चिंतामण पंतसचिव यांनी व कृष्णा शेटे यांनी महा. न. प. औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार प्रादेशिक आयुक्त व संचालक न. पा. प्रशासनकडे ७/६/२००२ रोजी तक्रार दाखल केली होती. ११/६/२००२ रोजी त्यांनी योग्य ती पडताळणी करुन भोर न. पा.ला आदेश पारित केले असताना, संबंधितांनी त्या आदेशाची दखल घेतली नाही. पंतसचिवांचे या मनाई विरुद्ध नगरपरिषद प्रशासनाने २००४मध्ये दिवाणी न्यायालय भोर येथे मनाई अर्ज दाखल केला होता. मात्र सुनावणीत नगरपालिकेने बेकायदा पाणी वापरल्याचे कबूल केल्याने न्यायालयाने मनाई अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पाणी वापर बंद केला. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ३०६८ दिवस पाणी वापरल्याने प्रति दिन २०० रुपये याप्रमाणे ६ लाख १३ हजार ६०० रुपये व त्यावर व्याज १२ टक्के मिळावे म्हणून पंतसचिवांनी भोर न.प.ला नोटीस बजावली. त्यानंतर नगरपालिकेने १८ हजार पंतसचिवांना अदा केले. उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्याविरोधात २००५ रोजी पंतसचिवांनी दावा दाखल केला. त्याचा निकाल न्यायालयाने ११ लाख २० हजार व रक्कम वसूल होईपर्यंत व्याज द्यावे, असा निकाल २०११मध्ये दिला. मात्र याची दखल नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी घेतली नाही. त्यानंतर पंतसचिव व कृष्णा शेटे यांनी सन २०१५ रोजी सदर व्याजासह १४ लाख ६३ हजार ५९० रुपये वसुलीसाठी पुणे येथील न्यायालयात दरखास्त दाखल केला. त्यानुसार भोर नगरपालिका प्रशासनास न्यायालयाने नोटीस बजावल्या; मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नगरपालिकेची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून वादी पंतसचिव यांना १४ लाख ६३ हजार रुपये वसूल करून देण्याचा निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली असून, ११/४ २०१६ पर्यंत न्यायालयाने जप्तीचे आदेशांना स्थगिती दिली आहे. त्यानंतरच स्थगिती आदेशाची सुनावणी होईल़पंतसचिव हे एकेकाळचे भोरचे राजे होते. दुष्काळीस्थितीत त्यांनी विहिरीचे पाणी भोरच्या जनतेसाठी घेण्यास संमती दिलेली होती. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने यावर बोलता येणार नाही. पंतसचिवांची रक्कम देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, भोरच्या पंतसचिवांकडे अनेक वर्षांपासून पाणी व घरपट्टीचे सुमारे १४ कोटी ५० लाख रुपये थकले आहेत, ते त्यांनी अगोदर भरणे अपेक्षित आहे. - चंद्रकांत सागळे, नगराध्यक्ष, भोर नगरपलिका