सध्यपरिस्थितीत कोरोना महामारीमुळे आपण सगळेच अगदी मेटाकुटीला आलो आहोत. कोणाचाही फोन आल्यावर मनात एकच धास्ती असते की समोरून आता काय निरोप येईल? किंवा कोरोनामुळे आज कोणी जीव गमावला असेल? ही जरी वस्तूस्थिती आहे. सामान्य माणूस हा बँकांची कर्ज काढून आपला संसार करत असतो आणि दर महिन्याला घरात काटकसर करून त्यांचे हफ्तेदेखील प्रामाणिकपणे भरत असतो. पण आज परिस्थिती बदलली आहे. जवळजवळ हा संपूर्ण महिना लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने अजून दि. १५ मे २०२१ पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि लॉकडाऊनपुढे अजून किती वाढेल हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही. अशा नाजूक परिस्थितीत उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद असताना सर्वसामान्य माणसाने बँका, फायनान्स कंपन्या, क्रेडिट कार्ड यांचे हफ्ते कसे आणि कुठून भरायचे?
कोरोनाशी संघर्ष आणि आर्थिक ओढाताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:10 AM