हडपसर : अतिक्रमण विभाग आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अधिका:यांच्या आशीर्वादामुळेच पंडित नेहरू भाजी मंडई मोकळा श्वास घेऊ शकत नाही. पिकपॉकेट आणि चेनचोरीचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
दस्तूरखुद्द महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणा:या रस्त्यावरील हातगाडय़ा आणि फेरीवाल्यांनी खच्चून भरलेला असतो. मंडईच्या चारही प्रवेशद्वारासमोर रिक्षा आणि हातगाडय़ा, विक्रेते थांबलेले असतात. या गर्दीमुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त आणि अतिक्रमणच्या अधिका:यांनी गांधी चौक ते मगरपट्टा चौकार्पयत दोन्ही बाजूला असलेल्या शेड्सवर कारवाई केली. पाटबंधारे खात्याच्या जागेवर अतिक्रमण असले, तरी तेथे मूलभूत नागरी सुविधा महापालिका पुरवीत आहे, याचा विसर या अधिका:यांना पडलेला आहे. सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे लक्ष द्यायला महापालिका सहायक आयुक्तांना वेळ नसल्याचे बोलले जाते. त्यांच्यासाठी नगरसेवक आणि पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. (वार्ताहर)
4कारवाई केल्यानंतर अवघ्या दोन तासांत पुन्हा नव्याने शेड्स जागेवर उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही कारवाई नावालाच केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. सोलापूर रस्ता, कालव्यावरील दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणो दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. कालव्यावरील अतिक्रमणासंबंधी सांगितले, तर ते आमचे काम नाही. तुम्ही पाटबंधारे खात्याकडे तक्रार करा, असे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.