कापूरव्होळ : परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी मनावर कोणतेही दडपण न आणता भयमुक्त पद्धतीने परीक्षेला उत्साहाने व आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास परीक्षेचा ताणतणाव जाणवणार नाही़ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संयम, जिद्द, कष्ट व आत्मविश्वासाची शिदोरी सोबत असल्यास तुमचे यश कोणीही हिरावून घेणार नाही, असे मत संस्थेच्या सचिव डॉ़ भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले़ आप्पासाहेब बांदल माध्यमिक विद्यालय आळंदे (ता़ भोर) येथे इयत्ता १० वीचा निरोप समारंभ व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी आळंदेच्या सरपंच वनिता नांदे, उपसरपंच अमर राजेशिर्के, माजी विद्यार्थी संतोष धावले, सचिन बांदल, अमर राजेशिर्के, नवनाथ गाडे, सतीश बरदाडे, प्रवीण गाडे, प्रशांत बांदल यांनी या शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांची अमोलिक भर घालण्यासाठी एकूण ५०,००० रुपये किमतीची पुस्तके भेट देण्यात आली़ शाळेचे मुख्याध्यापक कक्षाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ या कक्षासाठी संभाजी बांदल, दीपक बांदल, शरद बांदल, नांदे व मांडके यांनी देणगीरूपाने मदत केली़ प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी सोनवणे यांनी केले़ सूत्रसंचालन माया तळेकर यांनी केले.
‘परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा’
By admin | Published: February 29, 2016 1:05 AM