शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी संभ्रमावस्था

By admin | Published: February 11, 2015 1:03 AM

कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येणार आहेत. या चर्चेतून ते शहरातील पक्षाची

मिलिंद कांबळे, पिंपरीकार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येणार आहेत. या चर्चेतून ते शहरातील पक्षाची स्थिती समजून घेणार आहेत. असे असले, तरी ते नक्की येणार का, हा प्रश्न पक्षाचे कार्यकर्तेच विचारू लागले आहेत. ठाकरे हे १६ फेबु्रवारीला शहरास भेट देणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी पुण्यापाठोपाठ ते येथे येणार होते. मुलीचा अपघात झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला. या प्रकारे अनेकदा त्यांनी पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला दुय्यम स्थान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात अनेक जाहीर सभा घेतल्या. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहरात येणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. यामुळे ते शहरातील पक्षबांधणीबाबत गंभीर नसल्याचा समज कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. ही पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांनी लोकसभा आणि विधानसभेत पक्षविरोधी काम उघडपणे केले. प्रचारासाठी काही जण बाहेरच पडले नाहीत. असे असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे पक्षात शिस्त आहे की नाही यावर शंका निर्माण होत आहे. यावर कार्यकर्ते प्रश्न विचारत आहेत. पक्ष बांधणीकडे पूर्वीपासूनच वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असून, ते पुढे येण्याचे टाळतात. काही पदाधिकारी फुटकळ आंदोलन करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. पद नसलेले अनेक कार्यकर्ते पक्षाचे लेटरहेड आणि व्हिजिटिंग कार्ड छापून बातम्या प्रसिद्ध करुन घेत चमकोगिरी करीत आहेत. या आधारे ‘स्वतंत्र उद्योग’ केले जात आहेत. अशा चमको कार्यकर्त्यांना लगाम लावला जात नाही. उलट तेच वरिष्ठांशी सलगी ठेवून असल्याचे चित्र आहे. ही स्थिती पाहून, पक्षनेत्यांवरील कार्यकर्त्यांचा विश्वास कमी होत आहे. ठाकरे शहरात नक्की येणार का असा सवाल पक्षाचे कार्यकर्तेच विचारु लागले आहेत. ठरावीक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन ही तारीख जाहीर केली आहे. ते नेहमीप्रमाणे आलेच नाहीत, तर, लांडगा आला रे आला ... अशी गत होऊ नये, असेच सच्च्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. ठाकरे हे शहर भेटीत येत आहेत. शहरातील समस्या जाणून घेण्याचा त्याचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१७ची महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चर्चेनंतर ते निर्णय घेऊन मुंबईतून शहर कार्यकारिणी जाहीर करतील, असे दिसते.