शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त अर्जामधून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली. परंतु, कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरुवात केली नाही. विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश मिळाल्याबाबतचे एसएमएस पाठविण्यात आले. प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा एसएमएस पाठविण्यात आले होते. परंतु,काही तांत्रिक कारणांमुळे गुगल मॅपवरील अंतर घेताना त्रुटी राहिल्या. त्यामुळे झालेली चूक दुरुस्त केली आहे.
शिक्षण विभागाचे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची अंतराचे लॉजिक चुकले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यात बदल करून सुधारित प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. प्रथमत: शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षायादी प्राधान्य दिले जाते. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. परंतु, चुकून शाळेपासून दूर अंतरावर असणा-या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत वरच्या क्रमांक ठेवण्यात आले होते तर शाळेपासून जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नंतरचा क्रमांक देण्यात आला होता. मात्र ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे,असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.