भोर उपजिल्हा रुग्णालयात १००, तर नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० एकूण १५० कोविशिल्ड डोस रविवार (दि. २३) रोजी लसीकरणासाठी आले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्यांचा पहिला लसीकरणाचा डोस झाला आहे व त्यांचे ४५ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लसीकरणासाठी यावे म्हणून फोन केले. त्यामुळे सोमवार (दि.२४) रोजी भोर उपजिल्हा रुग्णालयात सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, शासनाने नियम बदलून ४५ ऐवजी ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांचे लसीकरण केले जाईल असा आदेश आला असल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सांगितल्यामुळे दिवसभर रांगेत थांबलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल व्यक्त केली.
रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० डोस आले होते. मात्र पहिले लसीकरण झालेल्या व ८४ दिवस होऊन गेलेल्या ७ नागरिकांना, तर पहिला डोस २० जणांना सोमवार (दि.२४) रोजी देण्यात आला आहे. बाकीचे लसीकरण तसेच राहिले
आंबवडे, नेरे, जोगवडी,भोंगवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मात्र ही लस उपलब्ध नाही. त्यामुळे भाटघर धरण नीरादेवघर धरण व वीसगाव खोऱ्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित
राहिलाले आहेत. शासनाचे वेळोवेळी लसीकरणाबाबत बदलणारे नियम नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लसीकरणात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र भोर तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
भोर तालुका दुर्गम डोगरी असून कोरोना गाड्याची सुविधा, मोबाईलला रेंज नाही त्यामुळे भोर शहराशी फारसा संर्पक होत नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करायला भोरला येतात, मात्र आरोग्य विभागाच्या नियोजनाआभावी लोकांना लसीकरण न करताच परत जावे लागत आहे. यामुळे लोकांचा वेळ, पैसे जात असून विनाकरण मानस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण झाल्यावर त्याची अनेक केंद्रांवर नोंद होत नसल्यामुळे त्याचा मेसेज लसीकरण केलेल्या नागरिकांना येत नाही. यामुळे लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
पहिला लसीकरणाचा डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस ४५ दिवसांनी दिला जात होता. परंतु १० दिवसांपूर्वी शासनाचे नवीन आदेश काढून ८४ दिवसांनी दुसरा डोस देण्याचा आदेश काढला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
भोर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी.फोटो