बारामती : नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील मिळकतींना २० टक्के करवाढींबाबत नागरिकांनी घेतलेल्या हरकतींची शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी अधिकारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये झालेल्या मतभेदातून बाचाबाचीमुळे काही वेळ गोंधळ उडाला. बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीत २० टक्के करवाढ सुचविण्यात आली आहे. वाढीव हद्दीतील सुमारे १७ हजार ५०० मिळकतधारकांना या करवाढीच्या नोटिसा आल्या आहेत. या करवाढीला आजपर्यंत सुमारे साडेतीन हजार मिळकतधारकांनी हरकती घेतल्या आहेत. शुक्रवारी (दि. २९) हरकतींच्या सुनावणीसाठी नगररचनाकार अधिकारी शेंडे, कांबळे यांच्यासह मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते.या वेळी नगरविकास विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत सुनावणीला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसवेक विष्णुपंत चौधर, प्रशांत सातव यांनी मिळकतधारकांना वाजत गाजत पालिकेत आणले. यावर मिळकत धारकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश दिला जाणार नसल्याची अधिकाºयांनी भूमिका घेतली. त्यामुळे विरोधी गट आक्रमक होऊन गोंधळ उडाला. शेवटी दिवसभरात ११०० मिळकतधारकांची सुनावणी घेण्यात आली.अधिकाºयांच्या ताठर भूमिकेमुळे सस्ते यांच्यासह चौधर व सातव यांनी आक्रमक भूमिका घेतली. वाढीव हद्दीतील करण्यात आलेली करवाढ अन्यायकारक आहे. मिळकतधारकांना सुनावणीपूर्वी ३० दिवसांची नोटीस न देता दोन दिवस अगोदर नोटीस दिली. अनेकांना तर नोटीसच मिळाली नाही, त्यामुळे ही सुनावणी आम्ही होऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. तर अधिकाºयांनी काही वेळानंतर सुनावणीस सुरुवात केली. मिळकतधारकांना दोन दिवस अगोदर नोटिसा मिळाल्या आहेत. तर अनेक मिळकतधारकांना नोटीस न मिळाल्याने हरकतींची संधीच मिळू दिलेली नाही. वाढीव कराच्या नोटिसीमध्ये एकत्रित करांची माहिती दिलेली नाही. त्यामुळे सदर करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात अली.>...दरवाढ सत्ताधाºयांनीच सुचविलीबारामती शहरातील वाढीव करवाढ सत्ताधाºयांनीच सुचवली आहे,असा आरोप सुनील सस्ते यांनी केला. बारामती नगरपालिकेमध्ये भुयारीकर ५ टक्के आकारला जातो.ज्या भागात अग्निशामकची गाडी कधीही जाऊ शकत नसलेल्या ठिकाणीदेखील अग्निशामक कर आकारला जातो, हे चुकीचे आहे. नगरचना विभागाच्या अधिकाºयांनी सदर करवाढ कमी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा नगरसेवक सस्ते यांनी या वेळी केला.
करवाढीवरून विरोधकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:21 AM