पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, राज्य शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दोन वेळा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानुसार राज्य शासनाने व विद्यापीठाने आॅगस्ट-सप्टेंबरपासून संलग्न महाविद्यालयांना आॅनलाइन वर्ग सुरु करण्याबाबत कळविले. मात्र, यूजीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, महाविद्यालयात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी आॅनलाइन वर्गांना उपस्थिती लावत नाहीत. त्यातच आॅनलाइन शिक्षण गृहीत धरले जाणार किंवा नाही; याबाबत संभ्रम आहे.यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले असले तरी; राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने व विद्यापीठांनी याबाबत महाविद्यालयांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. परंतु, याबाबत कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत.आॅनलाइन शिक्षण गृहीत धरले जाणार आहे किंवा नाही. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू केले जाणार याबाबतचा संभ्रम राज्य शासनाने दूर करणे गरजेचे आहे.- प्रा. नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा गोंधळ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:56 AM