काही वेळातच वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले .यावेळी टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली असल्याचे टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले हे पुण्याकडे जात होते. या वेळी टोल कर्मचारी आणि त्यांच्यात वादावादी झाली. अभिजित तांबिले यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्याच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेची माहीती पाटस पोलिसांना मिळाल्या नंतर पोलीस टोल नाक्यावर दाखल झाले. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या दोन सहकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी सांगीतले.
टोल नाक्यावर गुंडगिरी वाढली
पाटसच्या टोल नाक्यावरील काही कर्मचारी गुंडगीरी करीत असल्याची गेल्या काही वर्षांपासूनची वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य वाहनचालक आणि वाहनातील प्रवासी यांच्यावर टोल देण्या-घेण्यावरून गुंडगिरी करून मारहाण करतात. मात्र, याकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने टोल नाक्यावर गुंडगिरी वाढली आहे. परिणामी, राजकीय हस्तक्षेपामुळे टोल नाक्यावरील काही कर्मचारी फोफावले आहे. अशा कर्मचाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून पुढे आली आहे.
.