नेरे : भोर तालुक्यातील शेतकरी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असणाºया कर्जमाफीची मुदत तीन दिवस राहिल्याने महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, आधार कार्डवरील हाताचे ठसे जुळत नसल्याने शेतकºयांना कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. यात नक्की चूक कोणाची, अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.भोर तालुका दुर्गम-डोंगरी असून शेतक-यांना कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. या ठिकाणी आल्यानंतर महा ई-सेवा केंद्रात रांगा लावून अर्ज भरावे लागतात. यातील बहुतांशी शेतक-यांचे आधार कार्डवरील रेषांना हाताच्या रेषा जुळत नसल्याने कर्जमाफीचे अर्ज भरता येत नसल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. साधारणपणे एक अर्ज भरण्यासाठी एक तास वेळ लागत आही. कधी सर्व्हर डाऊन होतो तर कधी आधार कार्डचे ठसे जुळले जात नाहीत. यामुळे पुन्हा पहिल्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी लागत असल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.तालुक्यातील कर्जदारांपैकी बहुतांशी शेतकरी अडाणी आणि वयोवृद्ध असल्याने मोठ्या अडचणी, समस्या येत आहेत. तालुक्यातील अनेक शेतक-यांना हा कर्जमाफीचा अर्ज भारण्यासाठी ३५ ते ४० किमी.हून यावे लागत असून असे प्रकार वारंवार घडल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
आधारचे ठसे जुळेनात, अर्ज भरले जाईनात, शेतक-यांना मनस्ताप, महा ई-सेवा केंद्रांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:02 AM