पुणे : नववर्षाच्या पहिल्या महिन्यात राज्यभरात रस्ता सुरक्षा मोहीम राबविली जाते. यंदा ही माेहीम १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. सोमवारी पुणे शहरातील रस्ता सुरक्षा मोहिमेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात वाहतूक शाखेतील उत्कृष्ट कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शहरातील वाहतूक शाखेच्या २५ विभागात रस्ता सुरक्षा मोहिमेत यंदा गाड्यांचा रिफ्लेक्टर बसविणे, वाहतूक नियमांबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे, वाहनांची तपासणी करणे, रक्तदान शिबिर आयोजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली.