शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

काँग्रेस उमेदवारावर प्राणघातक हल्ला

By admin | Published: February 21, 2017 2:42 AM

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यात वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी चपळाईने वार चुकविला. हाताला जखम झाली. ही घटना नेहरूनगर येथील पोस्ट कार्यालयाजवळ सोमवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घडली. ऐन निवडणुकीत उमेदवारावर हल्ला होण्याच्या घटनेमुळे या परिसरात दहशत असल्याचा प्रत्यय आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार किरण पवार सोमवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास घरी जात होते. त्या वेळी अंधारात एका अज्ञात व्यक्तीने त्यांना गाठले. डोक्यावर तलवारीचा वार केला. परंतु पवार यांनी तो चुकविला. तो वार हातावर बसला. हाताला किरकोळ जखम झाली. प्रभाग क्रमांक ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल भोसले, शिवसेनेचे कुणाल दिलीप जगनाडे, भाजपाचे संजय मंगोडेकर, काँग्र्रेस पक्षाचे किरण पवार, एमआयएमचे ज्ञानेश्वर पवार यांच्यासह दत्तात्रय तळेकर हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात पहिल्यापासूनच दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड अशा घटना याच भागात घडल्या आहेत. दोन टोळ्यांमधील गुंडांवर पोलिसांनी मोक्का, झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत तसेच तडिपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत.  नेहरूनगर परिसरातील नागरिक कायम दहशतीच्या वातावरणात वावरतात. मतदानाच्या दिवशी अधिक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)