काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 07:25 PM2020-01-01T19:25:47+5:302020-01-01T19:38:43+5:30

थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. 

In the Congress Bhavan, the image of Bhor MLA Sangram Thapte was blackened by congress activist | काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले 

काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले 

Next

पुणे : भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळ समावेशापासून दूर ठेवल्याने सुरु झालेला वाद संपायचे नाव घेत नसून आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, 'भोर-वेल्हा- मुळशी' असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने संतप्त समर्थकांनी सोमवारी  भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती.याशिवाय भोर नगरपालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती. मात्र इतक्यावरच न थांबता मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.

  आता थोपटे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील. सदर प्रकार घडला तेव्हा मी भोरमध्ये नव्हतो. मात्र अधिक माहिती जाणून घेतली असता हे माझे कार्यकर्ते नाहीत असे समोर आले आहे. कोणीतरी माझ्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला'.

मात्र या प्रकरणी आता पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक झाले असून अशा पद्धतीने काँग्रेस भवनाची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांचा निषेध म्हणून संग्राम थोपटे यांच्या फोटोला कार्यकर्त्याने काळे फासले आहे. थोपटे, विश्वजीत कदम आणि संजय जगताप यांचा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दलचा अभिनंदनाचा फलक काँग्रेस भवनच्या आवारात लावण्यात आला होता. त्याच फलकातील केवळ थोपटे यांच्या चेहऱ्यावर काळा रंग फासण्यात आला. त्यामुळे अधिक तणाव निर्माण होऊ नये याकरिता काँग्रेस भवनमध्ये काही वेळ कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान शहराध्यक्ष रमेश बागवे शहराबाहेर असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. 

Web Title: In the Congress Bhavan, the image of Bhor MLA Sangram Thapte was blackened by congress activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.