शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुण्याची पाणीकपात कांचन कुल यांच्या फायद्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:44 PM

भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पुणे : पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पाणीकपातीविरोधात यापुर्वी अनेकदा आंदोलने करण्यात आली असून यापुढेही पालकमंत्र्यांना याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

निवडणुक काळात खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले जात आहे. या कालव्यातून दौंड व इंदापुर तालुक्यामध्ये पाणी जाते. तर सध्या पुण्यामध्ये दिवसाआड पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. याविषयी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी व अभय छाजेड यांनी पालकमंत्र्यांवर टिकेची झोड उठविली. जोशी म्हणाले, ‘पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये सर्व धरणे भरली असताना त्याचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे पुणेकरांना एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. या कृत्रिम पाणीटंचाईला बापटच जबाबदार आहेत. कांचन कुल यांना निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठीच बापट यांनी प्रशासनावर दबाव टाकून पाणी सोडले. हे महापाप करून त्यांनी पुणेकरांची फसवणुक केली आहे.’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेही या महापापामध्ये सहभागी आहेत का? या प्रश्नावर जोशी यांनी बापटांनाच जबाबदार धरत मौन बाळगले.‘पाणीकपातीविरोधात काँग्रेसने यापुर्वी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण नियोजन न केल्याने पाणीकपातीची वेळ आली आहे. यापुढील काळातही पाणीकपातीबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन केले जाईल,’ असे बागवे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Waterपाणीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका