Pune by-election: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:25 PM2023-01-22T17:25:57+5:302023-01-22T17:26:04+5:30
कसब्यासाठी इच्छुकांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूककाँग्रेस लढणार आहे. या निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असणा०यांची नावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीतील हायकमांडला पाठवणार आहेत.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या जागेसाठी पाेटनिवडणुक होत आहे. कसबा विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतली आहे. कसबा पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी बैठक होणार
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी होणार आहे. यामध्ये या निवडणुकीवर प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी आहे. यामुळे ही जागा कोण लढविणार हे त्यापूर्वीच निश्चित करणे आवश्यक असल्याने ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे आली. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढली होती. त्यात ही जागा कॉंग्रेसकडे गेली. शिवसेना नगरसेवकाने बंडखोरी करून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहे; तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण तयार असल्याचे जाहीर केले आहे.