शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा उमेदवार कसबा मतदार संघ गाजवणार; पुण्यात पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:41 IST

प्रदेश कमिटी कडून फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. सन १९९१मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वसंत थोरात यांनी भाजपचे गिरीष बापट यांचा पराभव केला होता. आता या इतिहासाची पुनरावृत्ती घडणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची प्रतिक्रिया यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जो उमेदवार काँग्रेसचा असेल तो कसबा पेठेचा मतदारसंघ गाजवेल. कसबा पेठविधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. 

शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सोलापूर, अंधेरी या निवडणुका पाहता तेव्हा भाजप ने उमेदवार दिला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी सुरू केली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक तयारी शहर काँग्रेस ने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहे. काँग्रेस मधून उमेदवार देण्याची प्रक्रिया असते. प्रदेश कमिटी कडून फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार आहे. उमेदवार काँग्रेसचा असेल तो कसबा पेठेचा मतदारसंघ गाजवेल, प्रदेश अध्यक्ष आणि पक्ष जो आदेश देतील त्याचे पालन होईल.

आयोगाकडून दे धक्का

निवडणूक आयोगाकडून लगेचच या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपच काय, पण अन्य राजकीय पक्षांमध्येही ही जागा लढविण्याबाबत किंवा उमेदवार निश्चित करण्याबाबत काहीच चर्चा नव्हती. मात्र, बुधवारी आयोगाने अचानक कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा रीतसर कार्यक्रमच जाहीर केला. त्यामुळे आता उमेदवारी कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सव्वादोन हजारांनी अधिक

कसबा मतदारसंघ (मतदार)

एकूण : २ लाख ७५ हजार ४२८

पुरुष : १ लाख ३६ हजार ८७३

महिला : १ लाख ३८ हजार ५५०

तृतीयपंथी : ५

काय आहेत शक्यता? 

-- निवडणूक बिनविरोध- मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास सहानुभूती म्हणून महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्ष उमेदवारच देणार नाहीत.

-- अन्यायाची भरपाई- मागील विधानसभा निवडणुकीत मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकात पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. सिटिंग आमदार असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली. त्या अन्यायाची भरपाई म्हणून यावेळी इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.

- इच्छुकांना संधी- कोथरूड मतदारसंघातून भाजपमध्येच बरेच इच्छुक आहेत. खासदार व या मतदारसंघाचे माजी आमदार, पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

-- विरोधकांचे इच्छुक - यात मागील वेळचे काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाMLAआमदारMukta Tilakमुक्ता टिळकgirish bapatगिरीष बापट