लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शंभर वर्षापूवीर् नागपूरच्या अधिवेशनात काँग्रेसने ब्रिटीश सरकार विरोधात असहकार चळवळ करण्याचा निर्णय घेतला. आज पुणे शहर काँग्रेसच्या प्रवासाचा छायाचित्र प्रदर्शन व ध्वनीचित्रफिती मार्फत प्रक्षेपण करुन लोकांमध्ये काँग्रेस पक्षाने देशासाठी केलेल्या योगदानाचे प्रबोधन केले. काँग्रेस पक्षाने आधुनिक विचार करुन देशावर राज्य केले, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी काँग्रेस भवन येथे छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. त्याचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ नेते ॲड. अभय छाजेड आदि उपस्थित होते.
........
सेल्फी विथ तिरंगा
काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रात सोमवारी सोशल मिडियावर सेल्फी विथ तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी सांगितले. राष्ट्रभक्तीचे प्रतिक असलेल्या तिरंग्यासमोर सेल्फी घेऊन ती सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करायची आहे.पुण्यासह राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.