रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:09 IST2025-02-24T13:32:26+5:302025-02-24T15:09:53+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही धंगेकर यांना पक्षप्रवेशासाठी जाहीरपणे ऑफर देण्यात आली आहे.

Congress ex mla Ravindra Dhangekar now gets an offer from Ajit Pawars NCP | रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

Congress Ravindra Dhangekar: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. रवींद्र धंगेकर यांनी आधी एकनाथ शिंदे आणि नंतर मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने या चर्चांना आणखी बळ मिळालं. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही धंगेकर यांना पक्षप्रवेशासाठी जाहीरपणे ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मा. आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पण विचार करू शकता की. रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते,सक्षम लोकप्रतिनिधी आहात. निवडणुकीत हारजीत चालतच असते. नेतृत्व,कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुझ्यासोबत मी काम केले आहेच. काही दिवस बातमी येत आहे की तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात. कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ मा.अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहेत, ते तू अनुभवले आहेत. तुझ्यासारखे काम करणारा,सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता, लोकप्रनिधीने नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा, अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल," अशा शब्दांत ठोंबरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून आपले बहीण-भाऊ नाते कायम आहेच, असंही रुपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.

पक्षांतराच्या चर्चेवर रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

सोशल मीडिया पोस्टमुळे शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगू लागल्यानंतर नुकताच रवींद्र धंगेकर यांनी यावर खुलासा केला होता. धंगेकर म्हणाले होते की, "रिल टाकण्याचं माझ्या मनात होतं. शिवजयंतीचं वातावरण होतं आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. गळ्यात भगवा रुमाल होता. त्या फोटोवरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि वातावरण असं झालं की, मी शिवसेनेत चाललो आहे. भगव्या उपरण्यातच जन्म झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. मी मानवता कार्यकर्ता आहे", असं स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
 

Web Title: Congress ex mla Ravindra Dhangekar now gets an offer from Ajit Pawars NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.