शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 9:23 PM

सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. Congress facing groupism in Pune

पुणे : सन २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचे शहरातील नेते डोळे उघडायला तयार नाहीत. राजीव गांधी जयंतीनिमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार चुली मांडून पक्षातील गटबाजी कायम असल्याचेच दाखवून दिले गेले. पक्षाची संघटना शक्तीहिन झाली असून नव्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडे येण्याचा ओघही थांबला आहे. नेते निवांत व कार्यकर्ते त्यांच्या पेक्षाही निवांत असे चित्र निर्माण झाले आहे.संपुर्ण शहरावर राजकीय वर्चस्व असलेला काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षात शहरात मोडकळीस आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत कसेबसे बळ एकवटून उभ्या राहिलेल्या पक्षाला सव्वा तीन लाखपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. तरी अजूनही पक्षाचे नेते एकत्रितपणे काही करण्याऐवजी स्वतंत्रपणे आपापल्या भागात पक्षाच्या नावे कार्यक्रम घेत आहे. त्यांच्यापैकी कोणीही दुसºयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अन्य ठिकाणी कार्यक्रम केले ते काँग्रेस भवनात फिरकले नाहीत. त्यामुळे चार कार्यक्रम होऊनही पक्षाचे नाव मात्र कुठेच झाले नाही. परिणामी काँग्रेस भवन ओस व प्रभागही ओस अशी काँग्रेसची अवस्था झाली.काँग्रेसचे अजून कशातच काही नाही असेच चित्र आहे. विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत, मात्र त्यांना संघटनेच्या कामात रस नाही, दोन्ही आमदार बहुसंख्यवेळा मुंबईतच असतात.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण तसेच अन्य काही नेत्यांवर पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांनी पुण्यात लक्ष घातल्याचे दिसलेले नाही.प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती झाल्यानंतरही पुण्यातील पक्षाच्या स्थितीत फरक पडलेला नाही. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेत पक्षाचे फक्त ९ नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून पक्षवाढीचे काही घडताना दिसत नाही. युवक, महिला, मागासवर्गीय, कामगार अशा पक्षाच्या सर्वच आघाड्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे दिसते. पक्षाचे तळातील कार्यकर्तेही आता अगदी उघडपणे भाजपासमोर आपला टिकाव लागणार का असा प्रश्न विचारू लागले आहेत. काँग्रेस टिकणार नाही असा विचार करून नव्याने पक्षाकडे येणाºया युवा कार्यकर्त्यांचा ओघही आता कमी झाल्याचे पक्षाचे वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारीच खासगीत सांगत असतात.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी