न्हावी ३२२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे व के. डी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ग्रामविकास पॅनेल उभे केले होते. त्यात काँग्रेसच्या पॅनलला ७ पैकी ५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवरची सत्ता काँग्रेसकडे कायम राहिली आहे. विरोधी पॅनेलला २ जागांवरच समाधान मानावे लागले.
काँग्रेसच्या पॅनेलचे निवडून आलेले २ तर बिनविरोध ३ असे ५ सदस्य निवडून आलेले सदस्य खालीलप्रमाणे - सिमा भोसले व गणेश सोनवणे हे निवडून आले तर ऊर्मिला कारळे, शीतल सोनवणे, शिवाजी भालेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत.
आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून गावात विकासकामे करून न्हावी ३२२ गावाचा सर्वागीण विकास करणार असल्याचे पॅनेलप्रमुख आणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी सांगितले.
फोटो :
आमदार संग्राम थोपटे यांच्यासह न्हावी ३२२ ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार फोटो