काल पुण्यात काँग्रेसच्या कार्यालयात एका कार्यक्रमात खासदार शरद पवार उपस्थिती लावली. यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अटकेवरुन भाजप सरकारवर टीका केली. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव घेत ईडीचा दुरुपयोग सरकार करत असल्याचा आरोपही केला.
"काँग्रेस मुक्त भारत शक्य नाही कारण पक्षाची विचारधारा आणि योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे ठिकाण अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. काँग्रेसचे जवळपास सर्व दिग्गज महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. यापूर्वी पुणे काँग्रेसचे कार्यालय येथे होते. स्वतः राज्याचे मुख्य कार्यालय हेच होते, असंही खासदार शरद पवार म्हणाले.
'काँग्रेसचे योगदान आणि इतिहास दुर्लक्षित करता येणार नाही. "काही लोक म्हणतात की, आम्ही भारत काँग्रेस मुक्त करू, पण भारत काँग्रेसमुक्त करणे शक्य नाही. खरे तर भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेसची विचारधारा कोणतीही असो, काँग्रेसला पुढे न्यायचे आहे. तुम्ही काँग्रेसला दुर्लक्ष करू शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. "मला खात्री आहे की काँग्रेस-मुक्त भारतच्या विचारसरणीचा सामना करण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
खासदार शरद पवार यापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. पुणे जिल्ह्यातून त्यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.त्यांनी पुढ 1999 मध्ये काँग्रेसला राजीनामा दिला.
28 डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस झाला. स्थापना दिनानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर सभेला हजेरी लावली. यावेळी कन्हैया कुमार, नाना पटोले, केसी वेणुगोपाल, अशोक चव्हाण आणि इम्रान प्रतापगढ़ी हे काँग्रेस नेते उपस्थित होते.