रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच काॅंग्रेसने केले वृक्षाराेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 03:40 PM2018-08-28T15:40:37+5:302018-08-28T15:43:16+5:30
शहरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे काॅंग्रेस पक्षाने स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन केले.
पुणे : सततच्या पावसामुळे शहरातील विविध भागात माेठ्याप्रमाणावर खड्डे पडले अाहेत. या खड्ड्यांना चुकवतच वाहनचालकांना वाट शाेधावी लागत अाहे. त्यातच या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदवत असल्याने वाहतूक काेंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत अाहे. त्यामुळे काॅंग्रेसकडून अाज स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन करण्यात अाले. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये विट्टी दांडू, गाेट्या खेळून तसेच वृक्षाराेपण करत अांदाेलन केले.
एकीकडे महापालिकेकडून गणेश मंडळांकडून खाेद्ण्यात येणाऱ्या खड्ड्यांसाठी दंड अाकारण्यात येणार अाहे, तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांकरिता ठेकेदार अाणि केबल कंपन्या जबाबदार असताना महापालिकेकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत अाहे. त्यामुळे केवळ गणेश मंडळांनाच दंड का असा प्रश्नही काॅंग्रेसने यावेळी उपस्थित केला अाहे. या अांदाेलनात माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकड़े, माजी उपमहापौर सतीश देसाई, कांग्रेस पदाधिकारी बाबा नायडू, आप्पा शेवाळे ऋषिकेश बालगुडे आदि कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलन सयोंजक प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास हे अांदाेलन करण्यात अाले. यावेळी शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा महापाैर मुक्ता टिळक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात अाली. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांकडून हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी करण्यात येत अाहे.