पुणे : सर्वच पक्षांनी लाेकसभेच्या आगामी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटीने मतदारसंघनिहाय समन्वयकांची यादी जाहीर केली असून, त्यात पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी डाॅ. विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आली आहे.
नगर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे, तर कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे सातारा मतदारसंघ समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हातकंणगले लोकसभा मतदारसंघ समन्वयक म्हणूनची जबाबदारी ॲड. अभय छाजेड यांच्याकडे, तर माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय बालगुडे यांच्याकडे दिली आहे.