पुणे : वीजबिल दरवाढ विराेधात शहर व जिल्हा काॅंग्रेसच्या वतीने पुण्यातील महावितरण कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन करण्यात अाले. यावेळी सरकार विराेधात घाेषणा देत वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात अाली. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी अामदार माेहन जाेशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे अादी उपस्थित हाेते.
यावेळी वीज दरवाढ तसेच पेट्राेल-डिझेल दरवाढी विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात अाली. कार्यकर्त्यांनी हातात कंदील, दिवा धरला हाेता. तसेच विविध मागण्यांचे अाणि सरकारचा निषेध करणारे फलकही हातात धरण्यात अाले हाेते. महावितरणच्या मुख्य अभियंतांना मागण्यांचे पत्र देऊन अांदाेलन समाप्त करण्यात अाले. यावेळी बाेलताना बागवे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पेट्राेल- डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात अाली अाहे. अाणि अाता वीज दरवाढीचा झटका सरकार नागरिकांना देत अाहे. समाजातील प्रत्येक घटक या दरवाढीमध्ये हाेरपळून निघत अाहे. त्यातच अाता एक सप्टेंबर पासून वीजबिलामध्ये 10 टक्के वाढ करण्यता अाली अाहे. मुळात महाराष्ट्रात बाकीच्या राज्यांच्या तुलनेत पस्तीस टक्के अधिक दराने वीज दिली जाते. या वीज दरवाढीमुळे नागरिकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत अाहे. लाेकांच्या खिशावर डल्ला मारणारे हे सरकार अाहे. हे लुटारु सरकार अाहे.
माेदी सरकारला येत्या निवडणूकांमध्ये जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. त्यांच्या नेत्यांना पेट्राेल-डिझेल दरवाढीबद्दल उत्तरे द्यावी लागणार अाहेत. लाेकांना न्याय देण्यासाठी काॅंग्रेस लाेकशाही मार्गाने रस्त्यावर उतरली अाहे.