पुणे : यंदाच्या निवडणुकीत २२० जागा जिंकू असे भाजप सांगत आहे. असा कोणताही आकडा आम्ही सांगणार नाही. मात्र २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा आम्ही दुप्पट करू, असा दावा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात शनिवारी ते बोलत होते. साम-दाम-दंड आणि भेदाचा वापर करुन भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेत आहे. कर्नाटक आणि गोवा विधानसभेत त्यांनी असेच केले. भाजपचे हे वर्तन लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशी टीकाही थोरात यांनी केली.काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल विचारले असता थोरात म्हणाले, अनेक नेत्यांच्या विविध प्रकारच्या संस्था आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी ते भाजपकडे जात आहेत. एखाद्या पक्षाशी निष्ठा जपत असताना असे वर्तन होता कामा नये. हे लोकशाहीला धरुन नाही. भाजपदेखील साम-दाम-दंडचा उपयोग करुन विरोधी नेत्यांना फोडत आहे.आजचा काळ पक्षासाठी कठीण असला तरी, ही स्थिती पहिल्यांदा आली नाही. अगदी इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या होत्या. तसेच, १९९९ साली काँग्रेस फुटल्यानंतर देखील असेच वातावरण होते. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकारच आले, असे थोरात म्हणाले. आम्ही सर्व आव्हाने पेलून यश मिळवू. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. समाजमाध्यमे आणि काळाला अनुसरुन असलेल्या आयुधांचा वापर आम्ही निश्चित करु, असे त्यांनी स्पष्ट केले.मनसेबाबत अद्याप निर्णय नाहीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीसोबत घेण्यासंदर्भात राज्यात अथवा केंद्रीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही. कॉंग्रेस समोर १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. शक्य तिथे तरुण आणि महिलांना संधी दिली जाईल, अशी माहितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 5:30 AM