पुणे : ‘उक्ती प्रमाणे कृती’ करण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. हाच विचार काँग्रेसने पुढे नेल्यास विजयाचा पाया घातला जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री नाराणय राणे यांनी व्यक्त केले. तसेच, निवडणुकीत पराभव का झाला, याचे नेते व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसभवन येथून ‘महात्मा गांधी विचार अभिवादन’ यात्रेचा प्रारंभ नारायण राणे यांच्या हस्ते झाला. त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे चिटणीस शौराज वाल्मिकी, सहप्रभारी बालाराम बच्चन, युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक मुकारी अलगुडे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी, अंजनी निम्हण, शिवा मंत्री, उमेश कंधारे,हरजितसिंग बेदी आदी उपस्थित होते. नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन आडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
गांधींच्या विचारानेच काँग्रेस पुढे जाईल
By admin | Published: January 31, 2015 1:06 AM