विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

By राजू हिंगे | Published: July 19, 2024 07:39 PM2024-07-19T19:39:15+5:302024-07-19T19:39:50+5:30

काही दिवसापुर्वी कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष बदला अशी मागणी कॉग्रेसमधील काही माजी नगरसेवकांनी केली होती

Congress will not change city president until assembly elections - Ramesh Chennithala | विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यत कॉग्रेस पक्ष कुठल्याही शहरातील शहराध्यक्ष बदलणार नाही असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. 

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  ,काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
 
 यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यत कॉग्रेस पक्ष कुठल्याही शहरातील शहराध्यक्ष बदलणार नाही असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसापुर्वी कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष बदला अशी मागणी कॉग्रेसमधील काही  माजी नगरसेवकांनी केली होती. पण आता कॉग्रेस शहराध्यक्ष बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,  माजी आमदार बाळासाहेब शिवरकर,  आनंदराव गाडगीळ, दीप्ती  चौधरी, कमल  व्यवहारे माजी नगरसेविका वैशाली मराठे, सुजाता शेट्टी , लता राजगुरू ,रफिक शेख ,मेहबूब नदाफ ,अजित दरेकर,संगीता तिवारी,  नंदलाल दिवार,  संतोष आरडे , सुजित  यादव यावेळी उपस्थित होते.

Web Title: Congress will not change city president until assembly elections - Ramesh Chennithala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.