चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:01 PM2021-08-20T19:01:57+5:302021-08-20T19:07:00+5:30

विरोधी पक्षांंना एकत्र करत सोनिया गांधींचा पूढाकार

Congress will save a country that is in trouble due to wrong policies; Nana Patole's claim | चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

Next
ठळक मुद्देसंपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्तकाँग्रेसच्या काळात शांतता होती तर आता अशांतता

पुणे : भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांंना एकत्र करत आहेत. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आलेल्या पटोले यांनी पक्षाच्या दिवसभराच्या कार्यक्रमांनंतर पत्रकारांबरोबर काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला.

पटोले म्हणाले, दिल्लीत शेतकरी अनेक महिने आंदोलन करत आहेत, इंधनाचे दर आकाशाला भिडले, बेरोजगारी वाढत आहे व देशाचे पंतप्रधान यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. संपूर्ण देशच त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे,काँग्रेसच्या काळात शांतता होती, आता अशांतता आहे. 

भाजपा म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र अशी टीका करून पटोले म्हणाले, त्यांच्याच पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मागील ७ वर्षात स्विस बँकेतील संपत्ती ३०० पट वाढल्याचे म्हटले आहे. पुण्यात प्राईम लोकेशनच्या जागा विकायला काढल्या. यांचा स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडतो. वरपासून खालपर्यंत तिथे हेच सुरू आहे. हे मर्यादा ओलांडणारे लोक आहेत, आता देशातील जनताच त्यांना बरखास्त करेल. पक्षाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक बसवराज पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Congress will save a country that is in trouble due to wrong policies; Nana Patole's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.