Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

By राजू हिंगे | Published: June 21, 2024 02:14 PM2024-06-21T14:14:16+5:302024-06-21T14:14:57+5:30

सद्यस्थितीत पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय

Congress workers on horseback in Pune The administration was held on the line to draw attention to the traffic | Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

Pune Traffic: पुण्यात 'मविआ' चे कार्यकर्ते घोड्यावर; ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला धरले धारेवर

पुणे : शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात अभिनव आंदोलन करण्यात आले.  पुण्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रभूषण चौक ते एस पी कॉलेज या दरम्यान घोड्यावरून प्रवास केला. 

शहरात प्रवास करणे सामान्य पुणेकरांना जिकरीच झाला आहे . पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे .विद्यार्थी, कामगार वर्ग, व्यापारी, रुग्ण यांना शाळा ,कॉलेज, ऑफिस, दुकान, हॉस्पिटलमध्ये जाताना अक्षरशः तास तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. शिवाय या कोंडीमुळे अपघात होत आहेत . प्रशासन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. 

आरटीओ, महापालिका वाहतूक आणि पोलीस शाखा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे . यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर , माजी महापौर अंकुश काकडे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे ,अजित अभ्यंकर , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगिता तिवारी, माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, माजी नगरसेवक विशाल धनवडे  सहभागी झाले होते.

Web Title: Congress workers on horseback in Pune The administration was held on the line to draw attention to the traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.