पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय फोडलेल्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यावर नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. या याद्यांवर दोन दिवसांत ५१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. महापालिका मुख्यालय, सहा क्षेत्रीय कार्यालये आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार असून हरकतींचा निर्वाळा करण्यासाठी सहायक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करण्यासाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या प्रभागातील नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पहिल्या दिवशी २८ हरकती, तर दुसऱ्या दिवशी २३ हरकती प्राप्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)- महापालिका परिसरात एकूण मतदार १० लाख ८७ हजार १९८ असून, सुमारे एक लाख १६ हजार २५४ नवमतदार नोंदविले गेले. त्यामुळे मतदारांची संख्या १२ लाख ३ हजार ४५२ झाली आहे. मतदार जागृती अभियान व प्रबोधन केल्याने नोंदणी करण्यात आली. राजकीय पक्ष मतदार नोंदणीत सहभागी होते. त्यामुळे सुमारे दीड लाख मतदारांची भर पडली आहे.
प्रारूप मतदार यादीवर २ दिवसांत ५१ हरकती
By admin | Published: January 15, 2017 5:23 AM