पुणे : पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनातून जमा होणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.डॉ. पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांशी संमेलनाच्या स्वरूपाबाबत गप्पा मारल्या. साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, समन्वयक सचिन ईटकर, लेखक अरुण शेवते आदी उपस्थित होते. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बावीस्कर यांनी त्यांचे स्वागत केले.पाटील म्हणाले, ‘सध्याचा तरुण सोशल मीडिया आणि अन्य प्रसारमाध्यमांत अडकला आहे. त्यांना त्यातून बाहेर काढायचे असेल, अभिरुचीसंपन्न आणि समृद्ध करायचे असेल तर संमेलनाचे स्वरूप भव्यदिव्य आणि आकर्षकच असले पाहिजे. तरुणांना जोडण्यासाठी संमेलनाची वेबसाईट तसेच ‘साहित्यमित्र’ नावाच्या मोबाइल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
संमेलनात सामाजिक भानही जपणार
By admin | Published: December 22, 2015 2:30 AM