ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत ७ एप्रिलपासून ओतूर शहरासह परिसरात दररोजच नवीन कोरोना रुग्णांची सातत्याने १७ एप्रिलपर्यंत वाढ होत होती, परंतु रविवारी परिसरातील डिंगोरे, बल्लाळवाडी, उदापूर प्रत्येक गावात एक एक असे ३ नवीन रुग्ण सापडले. ओतूर शहरात एकही नवीन रुग्ण नाही. त्यामुळे ओतूर शहर व परिसराला दिलासा मिळाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
ओतूर परिसरात रविवारी फक्त ३ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ३२६ झाली आहे. १०९९ बरे झाले आहेत. १६३ कोविड सेंटर व ११ जण घरीच उपचार घेत आहेत. ५२ जणांचा मृत्यू झाला आहे . डिंगोरे येथील बाधितांची संख्या ८३ झाली आहे. ७८ बरे झाले आहेत ४ जणांवर उपचार सुरू आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. बल्लाळवाडीची बाधितांची संख्या ६९ झाली आहे. ५५ बरे झाले आहेत ११ जण उपचार घेत आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील बाधितांची संख्या ६४ झाली आहे. ४३ बरे झाले आहेत. लाॅकडाऊनचे कडक नियमामुळे माणसे घराबाहेर नाही बाजार नाही त्यामुळे संसर्ग नाही त्यामुळे रुग्णसंख्या रविवारी कमी झाली असावी, असे डॉ. सारोक्ते म्हणाले.