शनिवार (दि. १५) रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांना इंदापूर शहरातील पवार बंधूंचे निधन झाल्याचे समजले असता, शहरातील वडारगल्ली येथे जाऊन पवार कुटुंबाची भेट घेतली. या वेळी दत्तू पवार, अशोक पवार, मनोज पवार, सोमनाथ पवार, नगरसेवक अनिता धोत्रे, नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक अमर गाडे, पत्रकार सागर शिंदे, बाबा पवार आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा रत्नाकर मल्हारी मखरे यांचेही शुक्रवार (दि. १४) रोजी निधन झाले. इंदापूर नगरपरिषदेत १९९० च्या दशकात नगराध्यपदी रत्नाकर मखरे व उपनगराध्यक्षपदी पांडुरंग पवार यांनी पदभार स्वीकारला होता आणि एकाच दिवशी दोघांनी जगाचा निरोप घेतला. हा निव्वळ योगायोग, मात्र याची चर्चा संपूर्ण शहरात झाली.
माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे कुटुंबीयांची घेतली भेट
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचेही निधन शुक्रवारी झाले. त्यांच्या अंत्यविधीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे स्वतः उपस्थित होते. मात्र, मखरे कुटुंबीय प्रचंड दुःखातून जात असल्याने, राज्यमंत्री भरणे यांनी शनिवारी रत्नाकर मखरे यांच्या पत्नी शकुंतला मखरे, त्यांचा मुलगा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे, भिमाई आश्रमशाळेचे मुख्य सचिव ॲड. समीर मखरे व कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन आधार दिला.
इंदापूर येथे पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.