पुणे: महापालिका आायुक्त विक्रम कुमार यांनी जाहिर केलेल्या नव्या आदेशानुसार, उद्या (सोमवार) पासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तसेच मॉलही ५० टक्के क्षमतेने उघडणार असून, रेस्टॉरंट, बार, हॉटेल यांना रात्री १० पर्यंत खुली राहणार आहेत.
तर उद्यापासून अत्यावश्यक सेवेबरोबरच सर्व प्रकारची दुकानेही आठवड्यातील सर्व दिवस खुली राहणार आहेत. मात्र रात्री १० नंतर अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त संचारबंदी लागू राहणार असून, ५ लोकांपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. पुणे महापालिकेने आजपासून लॉकडाऊनमध्ये जाहिर केलेली शिथिलता केवळ महापालिका कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित नसून ही नवी नियमावली, पुणे कॅन्टोंमेंट बोर्ड व खडकी कॅन्टोमेंट बोर्ड यांना देखील लागू राहणार आहे.
उद्यापासून सुरू होणारे व्यवहार व आस्थापना
- सर्व दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली- मॉल ५० टक्के क्षमतेने - आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने अभ्यासिका, ग्रंथालय, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था - सार्वजनिक वाचनालय - व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने - कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना- मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस - रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री दहा पर्यंत़ (५० टक्के क्षमता)- लोकल ट्रेन मधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचारी - सर्व सार्वजनिक उद्याने, खुली मैदाने ( सकाळी ५ ते ९ पर्यंत व दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत)- सर्व आउटडोअर स्पोटर्स - सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम (५० लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ पर्यंत परवानगी)- लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत - अत्यंसंस्कार, दशक्रिया विधी व त्याच्याशी संबंधित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत - विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या ५० टक्के उपस्थितीत- महापालिका हद्दतील सर्व बांधकामे - पीएमपीएमएल बस सेवा आसन क्षमतेच्या ५० टक्के - माल वाहतूक करणाºया वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्तींना परवागनी - खाजगी वाहनातून, बसेस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतर जिल्हा करण्यास परवागनी़ - उद्योग व्यवसायास पूर्णत: खुली मात्र ५० टक्के उपस्थितीत
बंधने कायम - सिनेमागृह, नाटयगृहे पूर्णत: बंद - अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवारी इतर सर्व दुकाने पूर्णंत: बंद राहणार - शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत