पुणे- काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकजण यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी रात्रीच
रणपिसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे बंधू राजेंद्र रणपिसे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे त्यांच्यासमवेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना शोक संदेश पाठविला.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय मंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार माणिकराव ठाकरे, उपमहापौर सुनीता वाडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस मोहन प्रकाश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय दत्त, काँग्रेस नेते उल्हास पवार, मोहन जोशी, आमदार संजय जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, मनपा गटनेते आबा बागुल, संजय बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, दत्तात्रय बहिरट, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, साहित्यिक अर्जुन डांगळे, नगरसेवक अरविंद शिंदे, लता राजगुरू, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, अविनाश साळवे यावेळी उपस्थित होते.