बारामती: भादलवाडी (ता. इंदापूर) येथील महावितरणच्या कार्यक्रमावेळी भारतीय संविधानाचा अवमानप्रकरणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या घटनेचा निषेध करण्यात आला.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, भादलवाडी येथे मंगळवारी (दि. १४) महावितरणच्या कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेट मिळालेली संविधानाची प्रत पायदळी ठेवून अवमान करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारमधील नेते फुल-शाहू-आंबेडकर यांची नावे घेऊन पुरोगामी असल्याचा जो खोटा दावा करतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी भारतीय संविधानामुळे भेटलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे, सुखदेव अडागळे, उपाध्यक्ष अतुल साळवे, उत्तम श्रीरंग कांबळे,दत्तात्रय धेंडे , सूर्यकांत भोसले, विष्णू सोनवणे , केदार शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
पुणे येथे भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देताना पदाधिकारी.
१७०९२०२१-बारामती-०६.