संविधान प्रस्तावना भेट देण्याचा डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम
खोडद : ‘संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले आहेत. आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी संविधान एकदा तरी वाचायला हवे,’ असे आवाहन नीलम गायकवाड यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने खोडद ग्रामपंचायतीला भारतीय संविधान प्रस्तावना भेट देण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, उपसरपंच सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नीलम गायकवाड, कल्पना डोके,योगेश शिंदे,नवनाथ पोखरकर, संदीप घायतडके,विजय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा वाव्हळ, अमर सोनवणे,श्रीकांत सोनवणे, उमेश वाघंबरे, विक्रम वाव्हळ,गोपी खंडे, संतोष डोळस, अॅड.मिथिलेश शिंदे,संग्राम सोनवणे,दावीत इंगळे,संदीप उबाळे,अक्षय वाव्हळ,ऋषिकेश वाव्हळ,गणेश सोनवणे,माजी सरपंच विजय गायकवाड,संतोष काळे,विशाल पानमंद, प्रदीप बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वाव्हळ बोलताना म्हणाले की , "संविधान वाचन केल्यास आपल्या अधिकारांची आपल्याला जाणीव निर्माण होते. अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये. भारतीय नागरिक म्हणून संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक आहे.भारताच्या संविधान प्रस्तावनेला डॉ.आंबेडकरांनी एक महत्त्वपूर्ण मूर्त स्वरूप दिले आहे. संविधान प्रस्तावनेच्या माध्यमातून संविधानाविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना भेट देणार आहोत."
प्रास्ताविक संदीप घायतडके यांनी केले.सूत्रसंचालन रमेश साबळे यांनी केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले.
"संविधान हे राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेल्या मूळ आदर्श नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्रीय अस्तित्व ठरवितात. भारताचे संविधान हे एक सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वांत मोठे संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्वांचा आपल्या देशाला आदर्श घालून दिला आहे.
-.नीलम गायकवाड
ग्रामपंचायत सदस्या, खोडद,
"आपल्या देशाचा कारभार संविधानाच्या आधारावर चालतो. ग्रामपंचायत म्हणजे संसदेचा पहिला पाया आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची प्रस्तावना नाहीये ही बाब लक्षात आल्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये अशा ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
- दिनेश वाव्हळ, अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, जुन्नर तालुका
================================
130921\20210912_201014.jpg
कॅप्शन - जुन्नर तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने खोडद ग्रामपंचायतला संविधानाची प्रस्तावना भेट देण्यात आली.