पुणे: ग्रामीण महाराष्ट्र हगणदरी मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात निर्मल भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर शौचालय बांधण्यात आले असून त्यामुळे राज्यात १ कोटी १० लाख ६६ हजार १५६ कुटुंबांकडे शौचालय आहेत. राज्यातील ३४ जिल्हे ,३५१ पंचात समित्या व २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हगणदरी मुक्त झाल्या आहेत.केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यात २७ हजार ९०२ ग्रामपंचायतीमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. पायाभूत सर्वेक्षणाच्या आधारे राज्यामध्ये ग्रामीण भागात शौचालय बांधकाम व ग्रामपंचाती हगणदरीमुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यात ५० लाख २५ हजार ४७ कुटुंबाकडे शौचालय असल्याचे तर ६० लाख ४१ हजार १०९ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले होते.मात्र,निर्मल भारत अभियानंतर्गत सर्वच कुटुंबांसाठी शौचालय बांधून देण्यात आली आहेत. सन २०१७-१८ पर्यंत सार्वजनिक व सामुहिक शौचालय वापरणारी कुटुंबे २ लाख ८१ हजार २९२ होती. राज्यात नागरिकांसाठी ६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधण्यात आली आहेत,असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
राज्यात ६० लाख शौचालयाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:01 PM
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यात २७ हजार ९०२ ग्रामपंचायतीमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले.
ठळक मुद्देराज्यात १ कोटी १० लाख ६६ हजार १५६ कुटुंबांकडे शौचालय ६० लाख ४१ हजार १०९ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर