बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घर बुकिंग करत असाल तर संबंधित बांधकामाचे वेळापत्रक, गृह प्रकल्प योजना, घर ताब्यात देण्याची तारीख आणि बांधकाम पूर्ण होण्यास उशीर होणार असल्यास बांधकाम व्यावसायिकाकडे काय उपाययोजना आहेत ? याची माहिती आधीच करुन घ्या. यामध्ये फसलेल्या ग्राहकांची संख्या मोठी असते. बांधकाम वेळापत्रकानुसार तुम्ही पर्यायी घराची व्यवस्था केलेली असेत. बांधकाम वेळेत न पूर्ण झाल्यास तुमच्यावर विनाकारण आर्थिक संकट ओढावून घेऊ नका.
बांधकाम पूर्ण झालेले घर घेणार असाल तर बांधकाम विक्रेत्याकडे मालमत्तेचे टायटल, पझेशन आणि हस्तांतरणाचे अधिकार आहेत का? याची माहिती करुन घ्या. तसेच मालमत्ता कर, सोसायटी, पाणी आणि विजेची बिले भरली गेली आहेत का ? याची माहिती आधीच करुन घ्या. पुणे शहरात आता मेट्रोचे जाळे पसरत असून आंतरराष्ट्रीय विमानतळही येण्याच्या मार्गावर आहे. पुण्यात नव्या गावांचा समावेश झाला असून त्यामुळे पुण्याचा विस्तार वाढल्याचे आपण सर्वजण पाहतोय. अशा वेळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढल्याने पुण्याच्या लोकसंख्येत भर पडतेय. या सर्व कारणांमुळे काेरोना संपला नसला तरी घरांच्या मागणीत वाढ होताना दिसतेय हे वास्तव आहे. हे पाहता भविष्यात घरांच्या किमती आणखी कमी होतील म्हणून थोडे दिवस थांबू असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी आत्ताच गृह प्रकल्पात गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
- इंजि. अमित खांबे
बांधकाम व्यावसायिक