महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली असता शाळेची निसर्ग चक्रीवादळामुळे झालेली दुर्दशा बघून तातडीने आठपैकी दोन शैक्षणिक खोल्या पक्क्या बांधून देण्याचे मान्य केले, त्यासोबत शाळेला कमान, खेळाचे ग्राउंड, शाळेच्या वाल कंपाऊंडसाठी मागची भिंत आरसीसी, मिनी लायब्रररी, ट्रेनिंग सेंटर, मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या कामांसाठी एकूण ३५ लाख रुपये निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात आला. या कामासाठी महिंद्रा सीआयई युनियनचे उपाध्यक्ष महेशव राखुंडे, बाबूराव भोर यांनी विशेष पाठपुरावा केला.
या कामाचे भूमिपूजन आज रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने करून कामास सुरुवात करण्यात आली.
त्याप्रसंगी महिंद्रा सीआयईचे जॉन रॉनी (सीओओ), विश्वास पांडे (प्लांट हेड), रोहित लामखेडे (एच मॅनेजर), प्रशांत शर्मा (सीएसआर),
प्रमोद शिंदे (युनियन अध्यक्ष), महेश राखुंडे (युनियन उपाध्यक्ष), नीलेश लोकरे (जनरल सेक्रेटरी), राहुल पाटील (खजिनदार) संदीप पाटील (कॉन्ट्रॅक्टर) हे उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ घनवट,
सरपंच सुजाता भोर, ग्रामसेवक कल्याणी राजगुरू, उपसरपंच सतीश जैद, माजी सरपंच अरुण आण्णा गुंडाळ, उद्योजक रामदास जैद, चित्रपट निर्माते बाबूराव भोर, सदस्य दीपक कालेकर शाळेच्या मुख्याध्यापिका काळे,
शिक्षण समिती अध्यक्ष दत्ता राखुंडे, पोलीस पाटील संतोष भोर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत भोर, माजी सरपंच दिनकर जैद,गणेश भोर, रवी राखुंडे, प्रवीण जैद,जयवंत राखुंडे, पंढरीनाथ जैद,सागर भोर,मारुती राक्षे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ३१ वाडा निसर्ग चक्रीवाद
फोटो- गुंडाळवाडी (ता. खेड) येथे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित महिंद्रा सीआयईचे अधिकारी व ग्रामस्थ.