पुणे : महारेराकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक प्रकल्पाच्या बांधकाम गुणवत्तेची माहिती जाहीर करावी लागणार असून, त्यामुळे ग्राहकांना बांधकामाच्या दर्जाची खात्री मिळेल. त्या पार्श्वभूमीवर सदनिकेच्या बांधकामात उत्तम प्रतीचेच साहित्य वापरले आहे ना, बांधकामाचा दर्जा राखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, गुणवत्तेची पडताळणी कशी करावी याचे प्रशिक्षण अभियंत्यांना दिले जाणार आहे. ‘महारेरा’च्या मदतीने ‘कुशल क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे बांधकाम साईटवरील निरीक्षक अभियंत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. बांधकाम साहित्याची तपासणी कशी करून घ्यावी, तपासणीचे अहवाल कसे पडताळावेत आणि या चाचण्यांच्या निष्कर्षांची माहिती महारेराला कशी पुरवावी यासंबंधीच्या अभ्यासक्रमास ‘राष्ट्रीय बांधकाम कौशल्य विकसन परिषदे’ची (सीएसडीसीआय) मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे बांधकाम अभियंत्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी, प्रमुख तांत्रिक अधिकारी ज्ञानेश्वर हडदरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, कुशलचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, कुशलचे सदस्य समीर बेलवलकर, मिलिंद तलाठी, रुपेश बाँठिया, या अभ्यासक्रमातील प्रशिक्षणासाठी साहाय्य करणारे केशव वरखेडकर, उज्ज्वल कुंटे या वेळी उपस्थित होते.ज्या बांधकाम प्रकल्पांची १ डिसेंबर २०१८ नंतर महारेराकडे नोंदणी झाली आहे त्या सर्वांना ‘२-ए’ या विशिष्ट फॉर्ममध्ये बांधकाम साहित्य व बांधकाम पद्धतींच्या दजार्बाबत प्रमाणपत्र जाहीर करावे लागणार आहे. असे ५ हजार प्रकल्प राज्यात सुरू असून, त्यातील दीड हजार ते १६०० प्रकल्पांनी आतापर्यंत हा फॉर्म भरला आहे.चटर्जी म्हणाले, ‘बांधकाम साईटवरील अभियंत्यांसाठीच्या या नवीन अभ्यासक्रमामुळे ते या नियमांचे पालन करण्यासाठी आणखी सक्षम होतील. ‘२-ए’ फॉर्ममध्ये भरली जाणारी माहिती संकेतस्थळावर कुणीही पाहू शकेल. त्यामुळे सदनिका ग्राहकांची बांधकामाच्या दर्जाबद्दलची काळजी दूर होण्यास मदत होईल. त्यांचा विश्वास उंचावेल.
महारेराकडे नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांना गुणवत्ता जाहीर करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:00 PM
ग्राहकांना बांधकामाच्या दर्जाची खात्री मिळणार
ठळक मुद्देदीड हजार जणांनी जाहीर केली माहिती : महारेरा-क्रेडाई घेणार गुणवत्ता पडताळणी वर्गमहारेरा-क्रेडाई घेणार गुणवत्ता पडताळणी वर्गमेट्रो’तर्फे बांधकाम साईटवरील निरीक्षक अभियंत्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू