शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

बांधकाम कामगारांची होणार नोंदणी

By admin | Published: June 03, 2016 12:29 AM

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.

पिंपरी : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नोंदणी मोहीम राबविण्यास हिरवा कंदील दाखवत कार्यकारी अभियंता यांची नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्ती केली आहे. यामुळे शहरातील बांधकाम कामगारांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय लाभ मिळण्याचा अडसर दूर झाला आहे. आयुक्त वाघमारे यांनी मोहीम राबविण्याबाबतचे आदेश दिल्याचे कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले. महापालिकेतर्फे बांधकाम कामगार नोंदणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी योग्य समन्वय साधून बांधकाम नाका कामगार व महापालिकेच्या छोट्या-मोठ्या साइटवरील कामगारांची नोंदणी व त्यांना मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ६ नोव्हेंबर २०१५ रोजी या संदर्भात अधिसूचना जारी करत प्रत्येक महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होर्ते मात्र, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले होते. नोंदणी मोहिमेस हिरवा कंदील मिळाला आहे. महापालिकेच्या बांधकाम साइटवरील कामगार व नाका कामगार यांना कार्यकारी अभियंता नोंदणी प्रमाणपत्र देणार असून, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील हजारो बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंद होणार आहे.या मागणीसाठी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे, किशोर हातागळे, सचिन गुंजाळ, गंगाधर कांबळे व महादेव धनवे यांनी पाठपुरावा केला होता.(प्रतिनिधी)नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विमा योजना, शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य, प्रथम लग्नासाठी अर्थसाहाय्य, प्रसूती लाभ, कामावर मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई, अंत्यविधी मदत व वारसास प्रतिवर्ष अर्थसाहाय्य अशा महत्त्वपूर्ण योजनांचा त्यात समावेश आहे.