दुर्बिण उभारण्याच्या प्रकल्पात सोळा देश सहभागी होणार आहेत. त्यात सध्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंग्डम, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल आणि चीन या देशांना सदस्यत्व प्राप्त झाले आहे. तसेच या प्रकल्पात भारत, जर्मनी, कॅनडा, जपान, स्पेन, दक्षिण कोरिया, निरीक्षक सदस्य कार्यरत असून प्रकल्पात औपचारिक सदस्य राष्ट्र म्हणून मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून या दुर्बिणीच्या कामात भारत सहभागी आहे. टीआयएफआर- नॅशनल सेंटर फॉर रेडिओ फिजिक्स (एनसीआरए) ही संस्था भारतीय वैज्ञानिकांचे समूहाचे नेतृत्व करत आहे.
एनसीआरएचे सेंटर डायरेक्ट प्रा. यशवंत गुप्ता म्हणाले, एसकेएओ येथे भारतीय वैज्ञानिक काम करत आहेत. यामध्ये भारताच्या सहभागाचे पुनरावलोकन केले जात आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. भारताला या प्रकल्पात २०११ अखेरीस सदस्यत्व मिळेल अशी आशा आहे.
---------
''एसकेएओ'' द्वारे वैज्ञानिक निरीक्षणामध्ये विश्वाच्या इतिहासातील अणू हायड्रोजन वायूचे मोजमाप, तेजस्वी श्रद्धांचे आणि वैश्विक चुंबकीय क्षेत्रांची उत्क्रांती, वेगवान रेडिओ बर्टर सारख्या क्षणिक वस्तूंचा अभ्यास करणे, पल्सर आणि गुरुत्वाकर्षणाच्या लाटा यांचा आजच्या व्हिडिओ टेलीस्कोपी द्वारे अभ्यास करता येणार आहे.
--------
दुर्बिण बांधकामाला कोरोनाचा फटका
दुर्बिणीसंदर्भातील बांधकामाला जगभरात पसरलेल्या कोरोना साथीचा फटका बसला आहे. सेलफोन टॉवर, विमान किंवा इतर स्रोतांच्या सिग्नल हस्तक्षेपामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांसाठी एसकेएओ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये संबंधित उद्योगांचे तांत्रिकी चर्चा करत आहे. कोरोना बाबतची परिस्थिती सुधारल्यानंतर आवश्यक कंटेनर आणि इलेक्ट्रॉनिक्स वाहतुक कशी करावी, या विषयीचा अंदाज घेतला जात आहे, अशी माहिती फिलीप डायमंड यांनी दिली.