सणसर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांचे वतीने
सणसर - ता इंदापूर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आज सणसर येथे ग्राहक जागरण पंधरवड्याचा शुभारंभ झाला.
केंद्र सरकारने नुकताच 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणला त्या कायद्याविषयी लोकांमध्ये जाणीव, जागृती व्हावी, ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या इंदापूर तालुका यांच्या वतीने ''''ग्राहक जागरण पंधरवडा ''''आज शुभारंभ झाला.
यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर ,इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर ,भाजपाचे सचिन भाग्यवंत, इंदापुर काँग्रेसचे उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख विजय शिरसट, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस वसंत जगताप,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार,श्रीनिवास कदम, रमेश कांबळे, विजय भाग्यवंत, सुधीर भिसे, वैभव निंबाळकर, गणेश निंबाळकर, इंदापुर तालुकाध्यक्ष किशोर भोईटे ,रवी खरात हे उपस्थित होते. यावेळी दिलीप निंबाळकर यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती देऊन फसवणुक झाल्यास ग्राहकांनी या कायदयाचा प्रभावी वापर करावा अशी माहिती दिली.
--
फोटो क्रमांक : १६सणसर ग्राहक पंधरवडा
फोटो ओळ - ग्राहक जागरण पंधरवडा ची सुरुवात करताना कार्यकर्ते