शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदे, खातेवाटपाचा तिढा सुटणार? शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड
2
मित्र दारू पिण्याचा आग्रह करताहेत काय कराल?; एमपीएससीच्या परीक्षेत प्रश्न
3
"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
4
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
5
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
6
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
7
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
8
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
9
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
10
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
11
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
12
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
13
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
14
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
15
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
16
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
17
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
18
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
19
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
20
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

By नम्रता फडणीस | Published: December 02, 2024 4:53 PM

दि. १ जानेवारी २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारलेली ‘फोर जी’ची रक्कम 'टू जी’च्या दरानुसार लागू करण्याचा आदेश

 पुणे : ग्राहकाला निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. दि. १ जानेवारी २०१८ ते ३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारलेली ‘फोर जी’ची रक्कम ‘टू जी’च्या दरानुसार लागू करावी तसेच उर्वरित रक्कम ग्राहकाला परत करण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या सरिता पाटील व शुभांगी दुनाखे यांनी हा आदेश दिला. याशिवाय तक्रारदारांना नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये देण्यात यावेत. तसेच निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अंमलबजावणी करावी. अन्यथा दरमहा ५०० रुपये देय होईल, असेही आदेशात म्हटले आहे.याबाबत चंद्रशेखर जोशी (रा. बाणेर) यांनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार मोबाइल कंपनीचे चार वर्षांपासून ग्राहक आहेत. ते कनेक्शन घेतल्यापासून नेटवर्क कव्हरेज योग्य नसल्याची तक्रार करत होते. मात्र, कंपनीने गांभीर्य दाखविले नाही. कंपनीने पाठविलेल्या ई-मेलवर हे मान्य देखील केले. तक्रारदारांच्या भागामध्ये २ जी नेटवर्क योग्यरीतीने काम करते. मात्र, ३ जी आणि ४ जी अत्यंत कमी दर्जाचे आहे.वारंवार मागणी करून नोडल ऑफिसरचा फोन नंबर व पत्ता दिला नाही. नंतर ट्रायच्या नियमानुसार कंपनीने नोडल ऑफिसरची नियुक्ती केली नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. तक्रारदारांना तीन वर्षांसाठी २९५ रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली. ३९९ रुपयांचा प्लॅन सहा महिन्यांकरिता २९९ रुपये केला. मात्र, नुकसानभरपाई व कमी बिलाचा आदेश तक्रारदारांना मिळालाच नाही. त्यानंतर पुन्हा नुकसानभरपाईची रक्कम १४१२ रुपयांपर्यंत वाढविली. तक्रारदारांचा प्लॅन कल्पना न देता २९९ वरून पुन्हा ३९९ रुपये केला. दरम्यान, तक्रारदारांची तक्रार बंद केल्याचे त्यांना ई-मेलने कळविले.त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली. नोटीस मिळाल्यानंतर कंपनी आयोगासमोर हजर राहिली. संधी देऊनही कंपनीने योग्य मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

टॅग्स :PuneपुणेVodafoneव्होडाफोनVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)consumerग्राहकCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस