Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकले असल्यास 'या' नियंत्रण कक्षाशी संपर्क करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 08:10 PM2022-02-24T20:10:59+5:302022-02-24T20:11:09+5:30

पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा

Contact the control room if you are stuck in Russia Ukraine War | Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकले असल्यास 'या' नियंत्रण कक्षाशी संपर्क करा 

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकले असल्यास 'या' नियंत्रण कक्षाशी संपर्क करा 

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. 

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

 नवी दिल्ली येथील मदत कक्ष 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in 

पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक 

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371
ई मेल controlroompune@gmail.com

Web Title: Contact the control room if you are stuck in Russia Ukraine War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.